 |
डायबेटिक असोसिएशन ऑफ़ इंडिया, पुणे शाखा ही एक नोंदणीकृत सेवाभावी संस्था असून गेली ५९ वर्षे सातत्याने मधुमेहींना मदत करण्याचे कार्य करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश आहे. |
|
मधुमेहाविषयी समाजात जागृती करणे. त्यासाठी संमेलने, सभा, शिबीरे, कार्यशाळा आयोजित करणे. |
|
मधुमेहींसाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ व इतर तज्ज्ञांचा सल्ला व उपचार अल्प दरात करणे. |
|
अद्ययावत लॅबोरेटरीची सोय व अल्प दरात तपासण्या करणे. |
|
बालमधुमेही व गरीब रुग्णांना विनामूल्य किंवा अल्प दरात औषधे, सल्ला, उपचार व शिक्षण देणे. |
|
अद्ययावत आयुधांनी सुसज्ज असे 'डायबेटिक फ़ूट क्लिनिक चालविणे'. |
|
पुण्यात कर्वे रोडवरील मुख्य कार्यालया व्यतिरिक्त शहराच्या विविध भागात गरजूंसाठी तीन ठिकाणी उपशाखा चालविल्या जातात. |
|
’मधुमित्र’ या मासिकातून गेली ३५ वर्षे मार्गदर्शन. मधूमेह विषयक माहिती देणारे महाराष्ट्रातील हे पहिले मासिक असून त्याचे सभासद महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही आहेत. |
संस्थेच्या मालकीची स्वतंत्र वास्तू कर्वे रोडवर ’स्वप्ननगरी’ सोसायटीत असून तेथे कायमचा कर्मचारी वर्ग सर्व दैनंदिन कामे संगणकाचे माध्यमातून करीत असतात.
५० वर्षांपासून संस्थेची सुरुवात कै. डॉ. मा. पु. जोशी यांचे घरी लहान प्रमाणात झाली. त्यानंतर अनेक डॉक्टर्स व सेवाभावी व्यक्तींच्या योगदानातून संस्थेचा व्याप वाढत गेला. पुण्यातील प्रसिध्द फ़िजिशियन डॉ. जगमोहन तळवळकर यांचे अध्यक्षतेखाली संस्थेचे कार्य प्रगतिपथावर चालू आहे.
संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक देणगीदार, हितचिंतक, जाहिरातदार, यांचे योगदान आहे. मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातील मधुमेहींच्या संख्येतील वाढ ही जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त आहे. |