आवाहन

मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतातील मधुमेहींच्या संख्येतील वाढ ही जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त आहे. त्याला आळा घालण्यासाठी संस्थेने अनेक नवीन उपक्रमांची योजना आखली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त अशा उपक्रमांना चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेपुढे असलेल्या काही प्रकल्पांचे कार्य सुरुही झाले आहे. परंतु त्यासाठी लागणारे आर्थिक बळ व कार्यकर्ते कमी पडत आहेत. त्यासाठी आपल्यासारख्या सेवाभावी वृत्तीच्या मान्यवरांना आम्ही आवाहन करण्याचे ठरविले आहे. त्यास आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी खात्री आहे.

आपण खालील कोणत्याही प्रकारे संस्थेला मदत करु शकता :
रोख देणग्या: देणग्यांवर इनकमटॅक्स्‌ ८० जी कलमान्वये ५०% करसवलत मिळते.
लॅबसाठी विविध उपकरणे देऊ शकतात.
बालमधुमेही व गरीब रुग्ण दत्तक योजना : रु. १०००/- चे पटीत आपण देणगी देऊ शकता. रु. २०,०००/-देणगीच्या व्याजातून एका गरीब बालमधुमेहीचा इन्शुलिन इंजेक्शनचा एक वर्षांचा खर्च भागू शकतो. अशा एका मुलाचे पालकत्व स्वीकारणे.
पृष्ठदान: सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रसिध्द होणार्‍या स्मरणिकेत ’शुभेच्छा शुल्क’ रु. १०००/- देऊन स्मरणिकेच्या एका पानाचा खर्च देणे. पानाच्या शेवटी तळपट्टीमध्ये पृष्ठदान करणार्‍याचे नाव छापले जाईल.
जाहिरात देण्यासाठी मदत करणे.
पुण्यातील मधुमेहींच्या सर्वेक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
हा प्रकल्प संशोधनात्मक असल्यामुळे खूप खर्चिक आहे. परंतु आजपर्यंत मोठ्या प्रमाणात असे शास्त्रीय सर्वेक्षण झालेले नाही. इतर शहरांनाही तो मार्गदर्शक ठरेल. या प्रकल्पाची प्राथमिक तयारी पुर्ण झालेली आहे.
डायबेटिक एज्युकेटर, डॉक्टरांचे प्रशिक्षण व इतर कामासाठी आर्थिक मदत करणे.
संस्थेच्या कामासाठी नियमित वेळ देऊन स्वयंसेवक म्हणून काम करणे.
आपल्या मदतीमुळे संस्थेच्या कार्याला मोठा हातभार लागणार आहे. तरी आपण वर दिलेल्या किंवा अन्य प्रकारे योगदान देऊन संस्थेवरील आपला विश्वास दृढ करावा ही नम्र विनंती.

 

 
Site Designed by Brainlines
Privacy policy